नाशिक/उपनगर- नाशिक रोड येथील विहीतगाव भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत त्यांच्या कडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ६ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.