Nashik News : होळकर पुलाखालील मॅकेनिकल गेटला मुहूर्त! गांधी तलावातील प्रवाह राहणार बंद

Nashik News : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर पुलाखालील प्रस्तावित मॅकेनिकल गेटचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे
Ahilyabai Holkar Bridge, Nashik
Ahilyabai Holkar Bridge, Nashikesakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर पुलाखालील प्रस्तावित मॅकेनिकल गेटचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद केला जाणार असून, स्मार्टसिटी कंपनीने त्यासाठी महापालिकेला पत्र पाठविले आहे. (Nashik mechanical gate under Holkar Bridge news)

पावसाळ्यात गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असतो. या कालावधीत गोदापात्रात पाण्याचा प्रवाह असतो. सातत्याने विसर्ग होत असल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढते. अधिक प्रमाणात विसर्ग झाल्यास गोदाकाठावरील घरे, दुकानांमध्ये पाणी जाते व परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसविण्याचे प्रस्तावित केले होते. त्यासाठी २२ कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. गेटच्या माध्यमातून पुलापासून पुढील क्षेत्रातील पुराची पातळी नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे. (latest marathi news)

Ahilyabai Holkar Bridge, Nashik
Nashik NMC News : सहा दिवसात 8 कोटी वसुलीचे मनपामोर आव्हान!

२०१९ मध्ये कामाला सुरवात झाली. संथगतीने काम सुरू असल्याने प्रकल्प रेंगाळला. स्मार्टसिटी कंपनीमार्फत ठेकेदाराला अल्टिमेटम देण्यात आला. जूनपर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण करून महापालिकेकडे हस्तांतरित करायचे असल्याने आता ३१ मेपूर्वी काम करण्याचा अंतिम अल्टिमेटम दिला.

त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी कंपनीने केली आहे. महापालिका बांधकाम विभागाला पत्र लिहून तीन महिन्यांसाठी गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी केली.

Ahilyabai Holkar Bridge, Nashik
Nashik NMC News : अतिरिक्त FSI ने नगररचना विभागाला तारले! 241 कोटींचा महसुल जमा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Built 18 Historic Wells In Shikhar Shingnapur To Be Conserved With Restoration Work Underway
Ahilyabai Holkar Karjmukti Yojana 2026 beneficiary list released for 3266 farmers in Junnar
Baramati Event: Maharashtra Minister Announces Key Conditions for Farmers' Loan Waiver
Malhar Rao Holkar's Reign Documented
Marathi News Esakal
www.esakal.com