सिव्हिलमधील हलगर्जीपणा; रुग्ण दगावला

सिव्हिलमधील हलगर्जीपणा; रुग्ण दगावला
Published on: 
पान-१--३ -------------------- प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा हलगर्जीपणा; रुग्णाचा मृत्यू पत्नीस नातलगांचा गंभीर आरोप : उपचार न करता सोनोग्राफीस पाठविले, सिव्हीलसमोर आज धरणे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१८ : येथील जिल्हा रुग्णालयाच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयात श्वास घेण्यास त्रास असलेल्या रुग्णास प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तपासून उपचार न करता खासगीतून सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. परंतु अवघ्या २० मिनिटांमध्येच तो रुग्ण परत आला असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी उद्या (ता.१९) जिल्हा रुग्णालयाच्या आवारात संबंधितांवर कठोर कारवाईसाठी नातलगांकडून धरणे आंदोलन केले जाणार आहे. विष्णू आनंद काकवीपुरे (४०, रा. पंचशिलनगर, गंजमाळ) असे मृत रुग्णाचे नाव आहे. त्याची पत्नी सोनाली काकवीपुरे यांच्या माहितीनुसार, शनिवारी (ता.१७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचे पती विष्णू यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात आणले असता, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी तपासून त्यांना खासगी रुग्णालयातून सोनोग्राफी करून आणण्याचा सल्ला दिला. सोनाली यांनी उपचार तर सुरू करा, अशी विनंती केली असता डॉक्टरांनी नकार दिला. रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासही त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनी रिक्षातून खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी नेले. त्या नाव नोंदवीत असतानाच, विष्णू हे अचानक कोसळले. त्यांना रिक्षाचालकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा रुग्णालयात परत आणले असता, सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हे ऐकून सोनाली यांना धक्का बसला. वैद्यकीय अधिकाऱ्याकडे त्यांनी जाब विचारला असता, त्यांनी हात वर केले. आपण तपासलेच नसून सोनोग्राफीचा सल्ला आपण दिलाच नसल्याचे वैद्यकीय अधिकारी म्हणाल्याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विष्णू काकवीपुरे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप सोनाली काकवीपुरे यांनी केला आहे. घटनेची माहिती कळताच, शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी घटनास्थळी धाव घेत विष्णू काकवीपुरे यांना श्वास घेण्यास त्रास होता. त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावणे आवश्यक असताना प्रशिक्षणार्थींनी सोनोग्राफीसाठी खासगी रुग्णालयात पाठविले. तात्काळ उपचार करणे गरजेचे असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप डोके यांनी केला आहे. ..... कोट अवघ्या २० मिनिटात रुग्ण दगावतो. याला कारणीभूत वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आहेत. खासगी रुग्णालयात सोनोग्राफीसाठी पाठविणेच चुकीचे असून, अशा घटनांनी जिल्हा रुग्णालयाचे नाव मात्र बदनाम होते आहे. या घटनेत कठोर कारवाईसाठी सोमवारी (ता.१९) धरणे आंदोलन केले जाणार आहे. - दीपक डोके, सामाजिक कार्यकर्ते कोट श्वास घेण्यास त्रास होत असताना कोणताही उपचार न करता खासगी हाॅस्पिटलमधून सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे. तेव्हाच उपचार केले असते तर ते वाचले असते. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. - सोनाली काकवीपुरे, मृताची पत्नी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com