Nashik News : सुरक्षिततेसाठी भविष्यात ‘माध्यम’ शिक्षण गरजेचे; वादविवादात अनेकांची भाषा घसरत असल्याने जाणकारांचे मत

Nashik News : सोशल मीडियावर निकालाच्या दिवशी अनेक हॅशटॅग वापरले गेले, मीम्स बनविले गेले, पोस्ट लिहिल्या गेल्या पण या सर्वात पक्ष जिंकला नाही म्हणून अनेकांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
social media
social mediaesakal

Nashik News : व्यक्त होणाऱ्या सोशल मीडियावर निकालाच्या दिवशी अनेक हॅशटॅग वापरले गेले, मीम्स बनविले गेले, पोस्ट लिहिल्या गेल्या पण या सर्वात पक्ष जिंकला नाही म्हणून अनेकांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. कमेंटमध्ये वाद झाल्यावर अनेकांची भाषा घसरली. व्यक्त होण्याला कोणतेही बंधन नसल्याने माध्यमाला भविष्यात इंटरनेट सुरक्षिततेसाठी माध्यम शिक्षण गरजेचे होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. (Medium education needed in future for security)

अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच इंटरनेट मूलभूत गरज बनली आहे. इंटरनेट माणसाच्या आयुष्यात कायम सोबत असणार आहे. यादृष्टीने आता पावले उचलण्याची गरज आहे. जन्माला आलेल्या मुलाला शाळेत जाईपर्यंत मोबाईल माहीत झालेला असतो पण, तो मोबाईल हाताळायचा कसा किंवा त्याचा योग्य वापर कसा करायचा त्याची जाण नसते.

यामुळे काही विद्यार्थी इंटरनेटचा उपयोग करून अल्प वयात स्वत:चे स्टार्टअप सुरू करतात तर काही गेमिंग, पॉर्न, जुगाराच्या विळख्यात अडकून पडतात. प्रत्येक वयोगटासाठी इंटरनेट सुरक्षितता महत्त्वाची आहे. ती सुरक्षितता आर्थिक, मानसिक, शारिरिक सामाजिक, भावनिक सर्वार्थाची असते. माध्यम प्रशिक्षणामुळे इंटरनेट वापरताना धोक्याच्या जागा कुठे आहेत, हे माहिती असणे गरजेचे आहे.

एकदा कळले की, धोके कोठे होऊ शकतात आणि त्यापासून बचाव कसा करायचा, त्यादृष्टीने माणूस त्याचा विचार करू शकतो. बऱ्याच लोकांना इंटरनेटचे धोके कोठे असतात ते माहिती नसते. त्यामुळे बचाव कसा करायचा तेच लक्षात येत नाही. आज बरीचशी काम इंटरनेटच्या माध्यमातून चालतात अनेक ज्येष्ठांना त्याचा वापर करता येत नाहीत, परिणामी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यातून फसवणुकीच्या अनेक घटना घडतात. (latest marathi news)

social media
Nashik Lok Sabha Election : पराभवाची भाजपकडून झाडाझडती; प्रदेश कार्यालयाने मागविला अहवाल

आज प्रवास करायचा तर दारासमोर टॅक्सी, मनोरंजनासाठी विविध ओटीटी प्लॅटफॉर्म सोबतीला रिल्स, गेमिंग, भूक लागल्यावर आवडता पदार्थ समोर, ऑनलाइन शॉपिंग, डेटिंग ॲप, सेकंदांत मनी ट्रान्स्फर अशा सर्व इंटरनेटच्या माध्यमातून सुविधा आपल्याला हातभर मोबाईलच्या माध्यमातून मिळतात.

ज्या माध्यमातून या सुविधा मिळतात ते इंटरनेट स्मार्ट फोनचा आत्मा आहे. इंटरनेटमुळे जग मुठीत आले असले तरी, त्याचे धोके तेवढेच वाढले आहेत. म्हणूनच भविष्याचा विचार करता येत्या काळात सर्वांसाठी इंटरनेट सुरक्षितता महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी माध्यम शिक्षण ही भविष्याची गरज असणार असल्याचे समाज माध्यमाचे अभ्यासक सांगतात.

प्रशिक्षित होणे गरजेचे

भविष्यात स्मार्ट तंत्रज्ञान, सुपरफास्ट इंटरनेट, एआयच्या पुढची तंत्रज्ञान हे कायम आपल्यासोबत असणार आहे. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग न करता त्याचा कोणताही दुष्परिणाम होऊ न देता त्याचा योग्य वापर कसा केला पाहिजे, यादृष्टीने प्रशिक्षित होणे गरजेचे आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे असतात आपण त्यातील तोटे कमी करून फायदे जास्तीत जास्त मिळविण्याचे गणित बसवता आले पाहिजे आणि ते माध्यम शिक्षणातून साध्य होवू शकते.

"सद्सद् विवेक बुद्धीचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करावा. बरेचजण सोशल मीडिया हे टाइमपास म्हणून वापरतात पण त्याचा एखाद्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इंटरनेटवर फोटो व्हिडिओ, ऑडिओ हा कायदेशीर पुरावा सुद्धा ग्राह्य धरला जाऊन गुन्हा दाखल होऊ शकतो." - तन्मय दीक्षित, सायबर तज्ञ

social media
Nashik Lok Sabha Constituency : भाजप आमदारांना ‘उद्धव’ शिलेदार भारी! सत्ता नसताना संघर्षात्मक लढा उभारण्याचा दिला संदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com