Methi Price Fall: मेथीचे दर कोसळ्याने नवे जाखोड येथे 3 एकरवर सोडले पाणी! 10 रुपयात 4 जुड्या; शेतकरी हवालदील

Nashik News : डाळींब, कांद्यापाठोपाठ भाजीपाल्याचीही ही स्थिती असल्याने आता कोणते पीक करावे अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
Tukaram Pawar showing fenugreek planted in three acre field.
Tukaram Pawar showing fenugreek planted in three acre field.esakal

नरकोळ : नवे जाखोड (ता. बागलाण) येथील शेतकऱ्यांने आपल्या शेतात लवकर येणारे पीक म्हणून मेथी लागवड केली.मात्र मेथीला कवडीमोल भावामुळे भाजी शेतातच सोडून देण्याचे वेळ शेतकऱ्यावर आल्याने पन्नास हजार रुपयांचा खर्च व श्रम पूर्णपणे वाया गेले. डाळींब, कांद्यापाठोपाठ भाजीपाल्याचीही ही स्थिती असल्याने आता कोणते पीक करावे अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. (Nashik Methi price fall marathi news)

Tukaram Pawar showing fenugreek planted in three acre field.
Nashik Onion Rate Fall : कांदा गडगडला; 33 रुपयेप्रति किलोवरून 16 रुपयांनी विकण्याची वेळ

जाखोड येथील तुकाराम पवार यांनी डाळिंब बागेत आंतरपीक म्हणून मेथीला प्राधान्य दिले होते. तीन एकर क्षेत्रात शेताची मशागत करून तीन क्विंटल मेथी बियाणे टाकले. शेणखत रासायनिक खताचा माञा दिला निंदणी, पाणी भरणे यासह भाजीपाल्याची मोठी काळजी घेतली.

ऐन भाजी बाजारात जाण्याच्या आधीच १० रुपयांत चार जुडी याप्रमाणे मेथीचे दर कोसळले. बाजारभाव न परवडणारा होता. यामुळे मेथी काढणीसाठी खर्च न न करता ती शेतातच सोडून दिली. तीन एकर मेथीवर पाणी फेरल्याने त्यांना सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून एक रुपयाही हाती लागला नाही.

"भाव मिळेल या अपेक्षेने तीन एकरात मेथी भाजीचे पीक घेतले. बाजारात आवक वाढल्याने अचानक भाव कोसळले. त्यामुळे मेथीची विक्री न करता शेतात मेंढ्या सोडल्या. मेथीच्या भाजीपासून रुपयाही मिळाला नाही. उलट पन्नास हजाराचे कर्ज झाले."

- तुकाराम पवार, नवे जाखोड (Latest Marathi News)

Tukaram Pawar showing fenugreek planted in three acre field.
Nashik Onion Rate Fall : केंद्राच्या स्पष्टीकरणानंतर कांद्याच्या भावात घसरण; शेतकरी संघटना आक्रमक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com