Nashik News : मोबाईल विक्रेत्‍यांमध्ये ‘परप्रांतीय विरुद्ध स्‍थानिक’ वाद; बहुतांश दुकाने सलग दुसऱ्या दिवशी बंद

Nashik : गेल्‍या काही वर्षांत मोबाईल गल्‍ली म्‍हणून नावारूपाला आलेल्‍या महात्‍मा गांधी मार्गावरील मोबाईल ॲक्‍सेसरीज‌ विक्रेत्‍यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
Mobile sellers have closed their shops due to local versus foreign traders dispute.
Mobile sellers have closed their shops due to local versus foreign traders dispute.esakal

Nashik News : गेल्‍या काही वर्षांत मोबाईल गल्‍ली म्‍हणून नावारूपाला आलेल्‍या महात्‍मा गांधी मार्गावरील मोबाईल ॲक्‍सेसरीज‌ विक्रेत्‍यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मोबाईल दुरुस्‍तीच्‍या कामावरून परराज्‍यातील व्‍यावसायिक विरुद्ध स्‍थानिक व्‍यावसायिक असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे मंगळवार (ता.१९) पासून बहुतांश परप्रांतीय व्‍यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (nashik MG road mobile shops are closed due to shopkeeper strike marathi news)

मोबाईल कव्‍हर, स्‍क्रीन गार्डपासून तर चार्जर, हेडफोन अशा विविध वस्‍तू घाऊक तसेच किरकोळ स्वरूपात विक्री महात्‍मा गांधी मार्गावरील दुकानांमध्ये केली जाते. यात प्रामुख्याने प्रधान पार्क व सभोवतालच्‍या इमारतींमध्ये आतपर्यंत दुकाने आहेत. तसेच समोरील बाजूलाही कॉम्‍प्‍लेक्‍समध्ये दुकाने आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजस्‍थानी व्‍यावसायिकांकडून भाडेतत्त्‍वावर दुकाने घेत व्‍यवसाय केला जातो.

दरम्‍यान संबंधित व्‍यावसायिकांनी होलसेल व रिटेल व्यवसाय करावा. मात्र मोबाईल दुरुस्तीचे काम केवळ स्‍थानिक व्‍यावसायिकांना करू द्यावे, अशी मागणी मोबाईल रिपेअरिंग असोसिएशनकडून करण्यात आली. यामुळे मंगळवारी (ता. १९) वाद शिगेला गेल्‍यानंतर स्‍थानिक तसेच परप्रांतीय व्‍यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. बुधवारी (ता. २०) दुसऱ्या दिवशीही या संदर्भात ठोस तोडगा निघू शकला नाही. त्‍यामुळे बहुतांश दुकाने बंद होती. काही स्‍थानिकांनी दुकान उघडल्‍याचे यावेळी बघायला मिळाले. (latest marathi news)

Mobile sellers have closed their shops due to local versus foreign traders dispute.
Nashik News : खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील शेततळ्यात बुडून दोघ्या सख्ख्या भावांचा मृत्यू

वादाला राजकीय फोडणी

व्‍यवसायातील या वादात स्‍थानिकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी उडी घेतली. तर राजस्‍थानी व्‍यावसायिकांकडून आपल्‍या मूळगावी असलेल्‍या लोकप्रतिनिधींच्‍या माध्यमातून थेट केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे तक्रार केल्‍याचे समजते. त्‍यामुळे व्‍यवसायातील या वादाला आता राजकीय फोडणी लागली आहे.

लाखोंची उलाढाल ठप्प

शहर परिसरातील नागरिक तसेच छोट्या स्‍वरुपातील मोबाईल विक्रेते येथे मोठ्या संख्येने वस्‍तू खरेदीसाठी येतात. या परिसरात सुमारे दीडशेहून अधिक छोटे-मोठे व्‍यावसायिक कार्यरत असून, सध्या दुकाने बंद असल्‍याने गेल्‍या दोन दिवसांत पंचवीस ते तीस लाख रुपयांपर्यंतची उलाढाल ठप्प झाल्‍याचा अंदाज आहे.

Mobile sellers have closed their shops due to local versus foreign traders dispute.
Nashik News : रशियन राज्यक्रांतीचे नायक लेनिन एकाधिकार शाही विरोधात : डॉ. उदय नारकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com