Nashik Milk Rate Fall : दर घसरल्याने दूध उत्पादक अडचणीत

Milk Rate Fall : शेतीमालाच्या भावात नेहमीच होणारी चढ उतार त्रासदायक असल्यामुळे बहुतेक शेतकरी दूध व्यवसायात उतरले.
Milk Rate
Milk Ratesakal

Nashik Milk Rate Fall : शेतीमालाच्या भावात नेहमीच होणारी चढ उतार त्रासदायक असल्यामुळे बहुतेक शेतकरी दूध व्यवसायात उतरले. मात्र काही दिवसांपासून दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. घसरलेल्या दरामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. ३५ ते ३८ रुपये लिटरने विक्री होणारे दूध सध्या २४ ते २५ रुपयांपर्यंत खाली आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणाऱ्या दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. (Milk producers in trouble due to fall in price )

चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढलेले दर, दुधाचे घसरलेले दर यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. सरकारने हस्तक्षेप करून दूध दराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.लोकसभा निवडणुकीत कांदा, टोमॅटो, सोयाबीन, कापसाला योग्य दर मिळाला नाही म्हणून बदल झालेला असताना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण सुरु आहे. (latest marathi news)

Milk Rate
Nashik Tomato Rate Fall : टोमॅटो बाजारभाव दरात घसरण; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना

वर्षभर शेतकऱ्यांना पैसे कमवून देणारा हा व्यवसाय आर्थिक मंदीत देखील जोमाने सुरू होता. मात्र, काही दिवसांपासून या व्यवसायाला सरकारच्या धोरणांची नजर लागली आहे. ३५ ते ३८ रुपये गायीच्या दुधाचे दर होते, ते आज २४ ते २५ रुपयांवर आले आहेत. दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस असताना दर अतिशय खाली आल्याने दुग्ध व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस यायला वेळ लागणार नाही. सरकारने वेळीच हस्तक्षेप करून दूध दराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

''जनावरांचे पशुखाद्य महागले आहे. गायीच्या दुधाला ३५ ते ३८ रुपये लिटर मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी गुंतवणूक दूध व्यवसायात केली आणि आता दर २४ ते २५ रुपये लिटर मिळत आहे. यामुळे खर्च व उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने हा व्यवसाय तोट्यात चालल्याने शेतकरी खूप त्रस्त आहेत.''- सतीश नेहे (सिन्नर)

Milk Rate
Nashik Milk Rate Fall: दूधाचे दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत! कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होतेय कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com