A millet crop grown on mounds of earth.esakal
नाशिक
Nashik Bajra Farming : वीट भट्टीच्या मातीवर बाजरीचे पीक! अनोख्या प्रयोगात 7 पोते बाजरीची आशा
Latest Agriculture News : पावसाळ्यात विटा पाडण्याचे काम ठप्प असल्याने मातीचा मोठा डोंगर (ढिगारा) हा नुसता पडून राहतो. त्यांनी या मातीवर बाजरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला.
येसगाव : येसगाव बुद्रूक जवळच्या शेलारनगर येथील वीट उत्पादक अशोक शेलार यांनी वीट भट्टीच्या मातीवर दूरदर्शी नावीन्यपूर्ण प्रयोग केला. पावसाळ्यात विटा पाडण्याचे काम ठप्प असल्याने मातीचा मोठा डोंगर (ढिगारा) हा नुसता पडून राहतो. त्यांनी या मातीवर बाजरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. (Millet bajra crop on brick kiln soil)