

नाशिक : उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात कापरे भरलेय. मंगळवारी (ता. १०) जळगावचे किमान तापमान ८ अंश सेल्सियस नोंदविले असून, हे या दिवसाचे राज्यातील नीचांकी किमान तापमान राहिले. निफाडचे ८.९, तर नाशिकचे किमान तापमान ९.४ अंश सेल्सियस नोंदविले. दरम्यान, मोठ्या घसरणीनंतर पारा स्थिरावल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.