

नाशिक : शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला देण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला आहे. सध्या तालुका स्तरावर ५००, तर जिल्हा स्तरावर ८०० रुपये भत्ता मिळतो. विद्यार्थिनींना अतिरिक्त १०० रुपये विशेष भत्ता देण्यात येतो. वाढीव भत्त्यासाठी आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागविल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.