

येवला : नाशिक, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील पालकमंत्री कोण असावा, याच्यावर वाद आहे. हा वाद म्हणजे कार्यकर्त्यांनी केलेली ती मागणी आहे. म्हणून बुधवार (ता. ८)पर्यंत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील. येत्या दोन दिवसांत त्यावर तोडगा निघेल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. श्री. शिरसाट आज येवला दौऱ्यावर आले होते. बाभूळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यातर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.