

नाशिक : राज्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. जिल्ह्यातील किमान आठ आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दादा भुसे यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. याशिवाय किमान सहा आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे जिल्ह्यात किती मंत्रिपदे व नवीन चेहरे कोण, याची उत्सुकता आहे. भाजपमध्ये प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर यांच्या नावांची चर्चा आहे.