Nashik News : चांदवड तालुक्यातील गौणखनिज उत्खननाला आशिर्वाद कुणाचा? गोहरण शिवारातील खडी क्रशर प्लांट वादात

Nashik News : सारूळ येथील उत्खननाचा प्रश्‍न जिल्हाभर गाजत असतानाच तालुक्यातील गोहरण येथे अवैध उत्खनन व बेकायदेशीर खडीक्रशर प्लांट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे
stone crusher plant
stone crusher plantesakal

चांदवड : सारूळ येथील उत्खननाचा प्रश्‍न जिल्हाभर गाजत असतानाच तालुक्यातील गोहरण येथे अवैध उत्खनन व बेकायदेशीर खडीक्रशर प्लांट सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी थेट तहसिलदारांना कारवाईचे आदेश दिले. यावरून जिल्हा गौण खनिज विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (Nashik minor mineral mining in Chandwad taluka marathi news)

ग्रामपंचायतीच्या हद्दीत उत्खनन करण्यासाठी किंवा खडीक्रशर प्लांट सुरू करण्यापूर्वी विविध विभागांची परवानगी घ्यावी लागते. गोहरण शिवारात खडीक्रशर प्लांटसाठी यापुढे परवानगी न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०१९ ला मंजूर केला आहे. ग्रामपंचायतीने ठराव केलेला असताना देखील नितीन गुंजाळ, सचिन अग्रवाल व नितीन आहेर यांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक २१८/३ मध्ये उत्खनन करण्यात आले.

याविषयी थेट जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसिलदारांनी येथील खडी क्रशरची पाहणी करीत ते ‘सील’ केले आहे. पण, संबंधित व्यक्तीने कोट्यवधी रुपयांचे मशिन्स येथे उभे करून यापूर्वीच उत्खनन केले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीने गौण खनिज विभागाकडे अर्ज सादर करून उत्खननाची परवानगी मागितली आहे.

दंडात्मक कारवाईकडे लक्ष

मार्चअखेर सुमारे अडीच कोटी रुपये रॉयल्टी संबंधितांनी जमा केल्याचे समजते. गौण खनिज विभागाने एप्रिलमध्ये त्यांना उत्खननाची परवानगी दिल्याचे जिल्हा गौण खनिज विभागाने म्हटले आहे. मात्र, यापूर्वी झालेले उत्खनन व विनापरवनागी सुरू असलेल्या खडी क्रशरवर दंडात्मक कारवाई होणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.   (latest marathi news)

stone crusher plant
Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने जिवाची काहिली; चिमुरड्यांनी लुटला टँकरच्या रेन डान्सचा आनंद

पुन्हा परवानगीची घाई

गोहरणचे उत्खनन व खडीक्रशर प्लांट बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यावर तहसिलदारांनी कारवाईचा बडगा उगारला. पण, आता संबंधित विभागाकडे रीतसर अर्ज करून परवानगी मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. गौण खनिज विभागाने तातडीने या प्रकरणाची फाईल मालेगावला पाठवली आहे. त्यामुळे खडीक्रशर पुन्हा सुरू करण्याची घाई केली जात असल्याचे दिसून येते.

"बेकायदेशीरपणे सुरू असलेला खडीक्रशर प्लांट संबंधित तहसिलदारांनी ‘सील’ केला आहे. यापूर्वी त्यांनी केलेले उत्खनन आणि त्यासंदर्भातील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय या प्लांटला परवानगी दिली जाणार नाही."

- रोहिणी चव्हाण, जिल्हा खनिकर्म अधिकारी

"गोहरण येथील विनापरवानगी क्रशरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ते सील करण्यात आले होते. सदर क्रशरचा वापर पुणेगाव कालव्याच्या अस्तिरीकरण कामासाठी करण्यात येणार होता. त्यानुसार त्यांना मालेगाव अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून गौण खनिज उत्खननाचा परवाना मिळालेला आहे. कंपनीने किती गौण खनिजचा वापर केला याची तपासणी करण्यात येत आहे."

- मंदार कुलकर्णी, तहसीलदार, चांदवड

stone crusher plant
Dhule Water Scarcity : दुष्काळात ‘मनरेगा’ची कामेही कासवगतीने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com