

नाशिक : सत्ता स्थापनेसाठी १२ दिवस, मंत्रिपद जाहीर करण्यासाठी २० दिवस लागले. ३० दिवसांनी खातीवाटप, ५० दिवसांनी पालकमंत्री जाहीर झाले. त्यातही पालकमंत्रिपदासाठी आंदोलन, उपोषण होताना प्रथमच पाहत आहे. वाद टाळण्यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे तीन पालकमंत्री सर्व जिल्ह्यांना नियुक्त करावेत, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. २३) केली.