Nashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस ‘स्वच्छ व हरित गाव’ पुरस्कार; देशात तृतीय

Latest Nashik News : मोडाळे (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीला ‘स्वच्छ व हरित गाव’ या संकल्पनेकरिता देशातील तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Modale panchayat
Modale panchayatesakal
Updated on

नाशिक : केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पंचायत राज पुरस्कारांतर्गत मोडाळे (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीला ‘स्वच्छ व हरित गाव’ या संकल्पनेकरिता देशातील तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ११ डिसेंबरला नवी दिल्ली येथे या ग्रामपंचायतीला गौरविण्यात येणार आहे.केंद्र सरकारतर्फे पंचायत राज संस्थांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गौरव करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार देण्यात येतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com