Nashik Police : इ-चलन मशिनच्या एक ना अनेक तक्रारी! कारवाई करताना अडथळे; वाहतूक अंमलदारांनी वाचला तक्रारींचा पाढा

Nashik News : या मशिनपेक्षा पूर्वीचेच इ-चलन मशिन अधिक सोयीचे असल्याचे म्हणण्याची वेळ वाहतूक अंमलदारांवर आली आहे.
e challan machine
e challan machineesakal

नाशिक : ‘वन नेशन-वन चलन’ हा पायलट प्रोजेक्ट राज्य महामार्ग वाहतूक विभागाकडून नाशिकमध्ये राबविला जात असला तरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठीचे इ-चलन मशिन अंमलदारांना गैरसोयीचे ठरते आहे. या इ-चलन मशिन संदर्भात एक ना अनेक तक्रारी अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संबंधित कंपनीकडे केल्या आहेत. या मशिनपेक्षा पूर्वीचेच इ-चलन मशिन अधिक सोयीचे असल्याचे म्हणण्याची वेळ वाहतूक अंमलदारांवर आली आहे. (nashik more complaints of e challan machine marathi news)

महाराष्ट्र राज्य महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे तत्कालिन अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ‘वन नेशन-वन चलन’ या पायलट प्रोजेक्टसाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाची निवड केली होती. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून शहर वाहतूक शाखेतील अंमलदारांना सातत्याने प्रशिक्षणही दिले जात आहे.

यामुळे शहरातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील, राज्य-परराज्यातील बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करणे सोपे झाले होते. परंतु, दंडात्मक कारवाईसाठी दिलेले एनआयसी या कंपनीचे इ-चलन मशिन त्रुटींमुळे वाहतूक अंमलदारांना गैरसोयीचे ठरते आहे. त्यासंदर्भात एक ना अनेक तक्रारी असल्याने इ-चलन मशिन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

पायलट प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणाऱ्या इ-चलन मशिनबाबत अनेक समस्या वाहतूक अंमलदारांना उद्‌भवत आहेत. या मशिनसाठी असलेला कॅमेरा हा मशिनच्या मध्यभागी आहे. त्यामुळे अंमलदारांना बेशिस्त वाहनचालकाचा फोटो करताना गैरसोयीचे ठरते. तसेच, धावत्या बेशिस्त वाहनाचा फोटो ठळक येत नाही.

त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करता येत नाही. तसेच, हे मशिन इंटरनेटशी जोडलेले असते. परंतु बऱ्याचदा रेंजच्या समस्येने मशिनचा वापर करता येत नाही. मशिनसंदर्भात असलेल्या अनेक समस्यांचा पाढा वाहतूक अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इ-चलन मशिनच्या कंपनीकडे केल्या आहेत.

पुरावाच नाही

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा फोटो काढून संबंधित वाहनाच्या क्रमांकावर इ-चलन मशिनने पाठविला जातो. त्यानंतर तो फोटो त्या मशिनमध्ये पुन्हा दिसत नाही. त्यामुळे जेव्हा वाहनचालक वाहतूक अंमलदाराकडे पुरावा विचारतो. त्यावेळी त्यास दाखविण्यासाठी त्या इ-चलन मशिनमध्ये पुरावाच नसतो. त्यावरून अनेकदा वाहतूक कार्यालयात वादाचे प्रसंग उद्‌भवतात. (latest marathi news)

e challan machine
Nashik News : वणी आठवडे बाजारात ठेकेदाराची मनमानी; जादा करवसुलीने व्यापाऱ्यांसह शेतकरी त्रस्त

क्लृप्ती येते अंगलट

सिग्नल जंम्पींग, ट्रीपलसीट, राँगसाईड, रॅशड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनांचे फोटो इ-चलन मशिनमध्ये ठळकपणे येत नाहीत. त्यामुळे बहुतांशी अंमलदार असे फोटो त्यांच्याकडील मोबाईलमध्ये काढतात. त्यानंतर मोबाईलमधील ते फोटो इ-चलन मशिनमध्ये घेत संबंधित बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. ही क्लृप्ती अंमलदारांच्या अंगलट येण्याचीच शक्यता अधिक असते. तसेच, वादालाही सामोरे जावे लागते.

अशा आहेत तक्रारी

- इ-चलन मशिनला मध्यभागी दिलेला कॅमेरा मशिनच्या वरच्या बाजूला हवा

- दंडात्मक कारवाईनंतर तो डेटा इ-चलन मशिनमध्ये असावा

- बेशिस्त धावत्या वाहनांचे फोटो ठळक यावेत

- इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या सोडवावी

- कारवाई केलेल्या वाहनांचा डेटा सर्चमध्ये असावा

- फोटो अपलोट प्रक्रिया संथ असून ती गतीने होणे अपेक्षित

"वन नेशन-वन चलन अंतर्गत पायलट प्रोजेक्ट नाशिकमध्ये सुरू आहे. नवीन इ-चलन मशिन वापरताना येणाऱ्या त्रुटींची माहिती वेळोवेळी संबंधित कंपनीला दिली जाते. त्यातून मशिनमध्ये अपडेट केले जात आहेत. येत्या काळात ते अधिक प्रभावी करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत."- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

e challan machine
Nashik Water Scarcity : टँकरची संख्या वाढत चाललीय...! जिल्ह्यात दिवसाला 15 लाख रुपये खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com