
नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता पाच वर्षे सत्तेला धोका नाही. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरवातीला रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तसे स्पष्ट केले असून त्यांच्याकडून न्यायालयात प्रलंबित निकाल गतीने देण्याचे पत्र देण्याच्या सूचना केल्या.