Sharad Pawar : आता विधानसभेच्या तयारीला लागा; खासदार भगरे यांच्यासह ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

Nashik News : विधानसभा निवडणुकीतही यश मिळवायचे आहे. त्यासाठी आतापासून तयारीला लागा, चांगली कामे करा, लोकांच्या सतत संपर्कात राहा अशा सूचना पवार यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना केल्या.
Dindori MP Bhaskar Bhagare giving a bouquet to NCP Sharad Chandra Pawar party president Sharad Pawar.
Dindori MP Bhaskar Bhagare giving a bouquet to NCP Sharad Chandra Pawar party president Sharad Pawar.esakal

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तब्बल २० वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातून हिसकावून घेतल्यावर आत्मविश्वास उंचावलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आता विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले. त्या वेळी पदाधिकाऱ्यांनी विधानसभेसाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा घ्याव्यात, अशी मागणी केली. (MP Bhagare along with office bearers of NCP meet Sharad Pawar)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे विजयी झाले. विजय प्राप्त केल्यावर गुरुवारी (ता. ६) नवनिर्वाचित खासदारांची शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठक झाली. बैठकीपूर्वी, दिंडोरीचे खासदार भगरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे.

शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार नितीन भोसले, लक्ष्मण मंडाले, राजेंद्र मोगल, श्‍याम हिरे, अशोक पाळदे आदींच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. या वेळी खासदार भगरे यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्या वेळी शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. (latest marathi news)

Dindori MP Bhaskar Bhagare giving a bouquet to NCP Sharad Chandra Pawar party president Sharad Pawar.
Nashik Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

मतदारसंघातील एकूण चित्र कसे होते, विधानसभानिहाय पक्षाला किती मते मिळाली, कोणत्या मतदारसंघात कमी मते मिळाली, कमी मते कशामुळे मिळाली याबाबत पवार यांनी या वेळी विचारणा केली. त्यानंतर, पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत शेटे यांनी मोठे कष्ट घेतले असे सांगितले; तर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही यश मिळवायचे आहे. त्यासाठी आतापासून तयारीला लागा, चांगली कामे करा, लोकांच्या सतत संपर्कात राहा अशा सूचना पवार यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना केल्या. त्यावर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेत कमी जागा न घेता जास्त जागा घ्याव्यात. यातही नाशिक जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी मागणी केली.

Dindori MP Bhaskar Bhagare giving a bouquet to NCP Sharad Chandra Pawar party president Sharad Pawar.
Nashik Traffic Rules Break : चालकांनो थांबा, मगच बोला...! वाहन चालविताना मोबाईल असतो कानाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com