
नाशिक : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमातील घडलेला प्रकार निंदनीय आहे. आनंद दिघे असते तर यांना हंटर काढून फोडून काढले असते. लुटीच्या पैशांतून असे प्रकार होत आहेत, अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणीही केली. आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. (MP Raut scathing criticism of Shinde group on embezzlement of looted money)