MSEB News : 24 तास ‘ऊर्जा चॅट बॉट’ ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध

Nashik News : महावितरणने राज्यातील ३ कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
MSEB
MSEB esakal

Nashik News : महावितरणने राज्यातील ३ कोटी वीज ग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा चॅट बॉट’ चोवीस तास महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. (MSEB 24 Hours Energy Chatbot app Available for customer service)

इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना प्रश्न विचारता येत आहे तसेच नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, तक्रार निवारण आदींबाबत माहिती घेण्याची सोय उपलब्ध आहे. विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅट बॉट महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे.

राज्यातील घरगुती, वाणिज्यक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅट बॉट www.mahadiscom.in ही वेबसाइट व महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. नवीन वीजजोडणी वा त्यासाठी केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती, वीजबिल भरणा किंवा वीजबिलाचा तपशील, जलद वीजबिल भरणा.

मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्काचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर वाचन व सबमिशन, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅट बॉट थेट मदत करीत आहे. (latest marathi news)

MSEB
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

महावितरणच्या वीजसेवेबाबत माहिती हवी असल्यास ‘ऊर्जा’च्या माध्यमातून संबंधित सेवा ग्राहकांसाठी थेट ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना या चॅट बॉटमधूनच मिळणार आहे. यासोबतच वीजपुरवठा खंडित होणे तसेच वीजबिलांसह इतर तक्रारींबाबत संपूर्ण माहिती वीजग्राहकांना उपलब्ध होत आहे.

यामध्ये तक्रार करण्यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक, ‘एसएमएस’ क्रमांक, ई-मेल, मिस् कॉल सेवा आदींची माहिती चॅट बॉटद्वारे उपलब्ध आहे. ‘ऊर्जा’ चॅट बॉटचा वीजग्राहक मोठ्या संख्येने वापर करीत असून त्यांना वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत माहिती घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाण्याची आता आवश्यकता उरलेली नाही.

मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक क्रमांक सबमीट करून विविध सेवा घेण्यासाठी चॅट बॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येईल. तसेच इतर ग्राहकांना विविध सेवेचा लाभ घेता येत आहे.

MSEB
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com