Truck Accident
sakal
नवीन नाशिक: मुंबई-आग्रा महामार्गावरील सिडको परिसरात असलेल्या सत्यम मंगल कार्यालयाजवळ बुधवारी (ता. १८) पहाटे एक भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकचे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटल्याने तो थेट खाली सर्व्हिस रोडवर कोसळला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने चालक व इतर कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.