
नाशिक : मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी आयुक्त, अप्पर आयुक्त, उपायुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांची आपण भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.