स्वीकृत नगरसेवक नियुक्ती प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप

स्वीकृत नगरसेवक नियुक्ती प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप
Published on: 
पान दोन मेन (महापालिका इमारत लोगो घेणे) ------------------ दोन्ही बातम्या शेजारी शेजारी लावणे ---------------------- स्वीकृत नगरसेवक नियुक्ती प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप प्रक्रियेला स्थगिती देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया महापालिकेने गुपचूप राबवण्यास सुरुवात केल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक सुफियान जिन यांनी केला असून, ही प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी त्यांनी आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे केली आहे. महापालिका अधिनियमानुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर एका महिन्यात स्वीकृत सदस्यांची निवड अपेक्षित होती. नाशिक महापालिकेची निवडणूक १६ जानेवारी रोजी होऊनही ही प्रक्रिया अद्यापपर्यंत पार पडली नाही. या विरोधात जीन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी आठवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. मात्र, महापालिकेने याबाबत कोणतीही जाहीर प्रसिद्धी केलेली नाही. केवळ काही निवडक गटनेत्यांनाचे अर्ज वाटप करण्यात आले असून काँग्रेस पक्षालाही अर्ज देण्यात आला नसल्याचा आरोप जिन यांनी केला आहे. यामुळे समाजातील तज्ज्ञ, विचारवंत व्यक्ती या प्रक्रियेपासून अनभिज्ञ राहून त्यांची संधी हिरावली जात आहे. अर्ज कुठे दाखल करायचा, छाननी कोण व कशी करणार, हरकती कुठे मांडायच्या, स्वीकृत-नाकारलेल्यांची यादी कुठे लागणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचे जिन यांनी म्हटले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया बंद दाराआड की अर्जदारांसमक्ष होणार याचीही माहिती नाही. हा प्रकार अपारदर्शक व उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा असल्याने सध्या सुरू असलेली प्रक्रिया स्थगित करून जाहीर सूचना काढावी, अर्ज मिळण्याचे ठिकाण, कालावधी, अटी व बैठकीची तारीख अगोदर प्रसिद्ध करूनच पुढील प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ----------- टूडे साठी -------------- स्वीकृत नियुक्ती लांबणीवर; आता ४ नोव्हेंबरला अर्ज प्रक्रिया नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सुरू केलेली स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या लांबणीवर टाकण्यात आली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते, मात्र आता थेट ४ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे नगरसचिव विभागाने स्पष्ट केले. ३१ ऑक्टोबर कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होत आहे. सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाची यंत्रणा गुंतल्याने स्वीकृत पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, स्वीकृत नियुक्ती रखडल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेला सहा आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने चार महिन्यांची मुदत मागितली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत सहा आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे. या आदेशानंतरच महापालिकेने २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागवले होते. दहा स्वीकृत जागांसाठी भाजपला सहा, शिंदे सेनेला दोन तर ठाकरे सेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळण्याचे समीकरण चर्चेत असताना आता अर्ज प्रक्रिया लांबल्याने नियुक्तीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com