
नाशिक : वर्षातील ३६५ दिवसांपैकी जवळपास ११० दिवस लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणूक आचारसंहितेत गेल्याने महापालिकेच्या प्रशासनाला काम करण्यासाठी अवघे २५५ दिवस मिळाले. मात्र या दिवसात देखील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावणे शक्य होते, परंतु तसे झाले नाही. याउलट लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय कार्यकाळात कामांचा कसा बोजवारा उडतो व अधिकारीशाही कशी वरचढ होते हेच दिसून आले.