विषय समित्या सभापतींना कार्यालयाचा शोध

विषय समित्या सभापतींना कार्यालयाचा शोध
Published on: 
टूडे साठी ------------- विषय समित्यांच्या सभापतींना कार्यालयाचा शोध नगर सचिवांचे प्रशासनाला पत्र; सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : महापालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कार्यालय आणि सुविधांचा प्रश्न समोर आला आहे. नगर सचिव विभागाने बांधकाम विभाग आणि प्रशासनाला पत्र पाठवून सभापती, उपसभापतींना स्वतंत्र दालन, वाहन आणि मनुष्यबळासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. निवडीनंतर या पदाधिकाऱ्यांनी दैनंदिन कामकाजासाठी कार्यालय व मनुष्यबळाची मागणी नगर सचिवांकडे केली. त्यानुसार नगर सचिव संजय नेरकर यांनी उपायुक्त, बांधकाम, घनकचरा, यांत्रिकी आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाला निर्देश दिले आहेत. यात दालनांची दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता, फर्निचर, लिपिकीय कर्मचारी, वाहनचालकासह वाहन, तसेच संगणक, प्रिंटर, इंटरनेट आणि वायफाय सुविधा पुरविण्याचा समावेश आहे. दरम्यान, अद्याप दालने आणि वाहने न मिळाल्याने कामकाजात अडचणी येत असल्याने काही सभापतींनी गटनेत्यांच्या कार्यालयातच ठिय्या दिला आहे. भाजपकडे असलेल्या तीनही समित्यांच्या सभापतींनी भाजप गटनेता कार्यालयातूनच कामकाज सुरू केल्याचे समजते. -----------------------चौकट विषय समित्यांचे सभापती, उपसभापती - महिला व बालकल्याण समिती : सभापती - कोमल मेहरोलिया, उपसभापती - चित्रा तांदळे. - शहर सुधार समिती- सभापती : जागृती गांगुर्डे, उपसभापती - जयंत जाचक. - वैद्यकीय साहाय्य व आरोग्य समिती : सभापती - पुनम महाले, उपसभापती - सतीश निकम. - विधी समिती- सभापती : जुई शिंदे, उपसभापती - अंकिता शिंदे. - शिक्षण समिती- सभापती : शरद मोरे, उपसभापती - सोनाली भंदुरे. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com