उपनग- हेटाळणी, टिंगल व तिरस्काराचे धनी होत आजवर जगत आलेल्या तृतीयपंथी समुदायातील प्रतिनिधींना समाजात एक व्यक्ती म्हणून स्वीकारण्यासाठी वर्षानुवर्षे अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागत आलेला आहे. एकेक हक्क मिळवित सुरु असलेला त्यांचा व्यवस्थेविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नाही. पुण्यात डॉ. अमित उर्फ आम्रपाली मोहिते या तृतीयपंथी कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून साकारलेल्या महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांसाठीच्या पहिल्या सार्वजनिक शौचालयापाठोपाठ नाशिक महानगरपालिकेनेही तोच कित्ता गिरवित माणुसकीचे दर्शन घडविले आहे.