

नाशिक : महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या ३२ मीटर उंचीपर्यंत पोचू शकणाऱ्या अग्निशमन शिडीची १५ वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे शहरातील उंच इमारतींना आग लागण्याची दुर्घटना घडल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नवीन शिडीची व्यवस्था होईपर्यंत जुन्या हायड्रोलिक शिडीला मुदतवाढ देण्याची मागणी महापालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली आहे.