नाशिक महापालिकेला लसीचे ५ हजार ७०० डोस; ठराविक केंद्रांवरच मिळणार लस

४५ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यातही दुसरा डोस शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.
covid vaccine
covid vaccineGoogle

नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दुसऱ्या डोससाठी आरोग्य केंद्रांचे उंबरठे झिजविणाऱ्या नागरिकांसाठी सोमवारी (ता. १०) महापालिकेला ५७०० लसींचे डोस प्राप्त झाले. त्यात कोव्हिशील्डचे ४५००, तर कोव्हॅक्सिनचे बाराशे डोस आले आहे. ४५ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यातही दुसरा डोस शिल्लक असलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. (Nashik Municipal Corporation has received 5700 doses of vaccine)

गेल्या आठ दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींच्या टंचाईचा खेळ सोमवारी महापालिकेला ५७०० डोस प्राप्त झाल्याने काही प्रमाणात संपुष्टात आल्याचे दिसून आले. जेमतेम एक दिवस पुरतील एवढेच डोस प्राप्त झाल्याने पालिका प्रशासनासमोर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एक मेपासून कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांना मुदत संपल्यानंतरही दुसरा डोस न दिल्याने संताप व्यक्त केला जात होता. दुसरा डोस कधी मिळेल या आशेने ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य केंद्रांवर गर्दी केली. त्यांना नकार मिळाल्याने परत फिरावे लागले. गुरुवारी (ता. ६) महापालिकेला ४४०० कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले, परंतु १८ ते ४४ वयोगटासाठी प्राप्त डोस वापरण्यात आले.

आतापर्यंत शहरात कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे तीन लाखांहून अधिक डोस देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लस घेण्यासाठी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस न मिळण्याने कुचंबना झाली. १ मेपासून कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणे बंद करण्यात आले. पहिला डोस केंद्र सरकारच्या लसींचा असल्याने केंद्राकडून दुसरा डोसचा साठा प्राप्त होईल. त्यावेळी लसीकरण केले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. सोमवारी (ता. १०) सकाळी जिल्हा रुग्णालयाकडून कोव्हिशील्डचे ४६३०, तर कोव्हॅक्सिनचे १२०० डोस प्राप्त झाले. ४५ पेक्षा अधिक वयोगटातील व त्यातही दुसरा डोस घेण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या सहाय्यक अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.

covid vaccine
नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

४५ वयोगटापुढील नागरिकांसाठी येथे होणार लसीकरण

- कोव्हिशील्ड- रामवाडी, उपनगर, पिंपळगाव खांब, वडाळागाव, स्वामी समर्थ हॉस्पिटल, गंगापूर आरोग्य केंद्र, मखमलाबाद आरोग्य केंद्र, भारतनगर आरोग्य केंद्र, दसक-पंचक आरोग्य केंद्र, एमएचबी कॉलनी सातपूर, संत गाडगे महाराज दवाखाना, हिरावाडी आरोग्य केंद्र, कामटवाडे आरोग्य केंद्र, जिजामाता आरोग्य केंद्र (मेन रोड), म्हसरूळ, एसजीएम, तपोवन, वडनेर, गोरेवाडी, संजीवनगर, अंबड, नांदूर या केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीकरण होईल.

- कोव्हॅक्सिन- जेडीसी बिटको (नाशिक रोड), रेडक्रॉस (रविवार कारंजा), ईएसआयएस हॉस्पिटल (सातपूर).

१८ ते ४४ वयोगटासाठी येथे होणार लसीकरण

-इंदिरा गांधी रुग्णालय (कोव्हिशील्ड)

- नाशिक रोड शहरी आरोग्य उपकेंद्र (कोव्हिशील्ड)

- मायको, पंचवटी (कोव्हॅक्सिन)

- मायको, सातपूर (कोव्हॅक्सिन)

- सिडको आरोग्य उपकेंद्र (कोव्हॅक्सिन)

(Nashik Municipal Corporation has received 5700 doses of vaccine)

covid vaccine
उद्यापासून बाजार समिती बंद, धार्मिक विधींवरही बंदीमुळे संभ्रमावस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com