नाशिक- महापालिकेच्या सेवेत चुकीच्या पद्धतीने समायोजित करून घेण्यात आलेल्या ४९ शिक्षकांवर शिक्षण विभागाने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी न देताच एकतर्फी कार्यमुक्त केले. यावर शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी शिक्षण विभागाने २८ जुलैला ठेवलेली सुनावणी पुढे ढकलली असून, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात बोलविले जाणार आहे.