नाशिकमध्ये ३० हजार लोकसंख्येचे ४५ प्रभाग; ११ नगरसेवक वाढणार

nashik municipal Corporation.jpg
nashik municipal Corporation.jpgSakal

नाशिक : नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढती लोकसंख्या गृहीत धरून राज्य शासनाने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकमध्ये अकरा नगरसेवक वाढणार आहेत. त्या अनुषंगाने आता साधारण तीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त न झाल्याने प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम मंदावले आहे. दरम्यान, लोकसंख्येचा विचार करता गावठाण भागात अधिक नगरसेवक वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिकसह राज्यातील अठरा महापालिकांची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार असून, त्यासाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तीन सदस्यांचा एक याप्रमाणे प्रभागरचना होणार असून, यापूर्वी १२२ नगरसेवकांच्या संख्येनुसार तीन सदस्यांचे चाळीस तर दोन सदस्यांचा एक असे एकूण ४१ प्रभाग निश्‍चित करण्यात आले होते. कोरोनामुळे सन २०२१ मध्ये जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आल्याने सन २०११ च्या लोकसंख्येप्रमाणे प्रभागरचना तयार करण्याच्या सूचना होत्या. परंतु, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्या वाढल्याने पंधरा टक्के वाढ गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता तीन सदस्यांचे ४४, तर एक सदस्यीय एक असे एकूण ४५ प्रभाग निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३२ ते ३६ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने एका प्रभागाची लोकसंख्या २८ ते तीस हजारपर्यंत येणार आहे.

nashik municipal Corporation.jpg
नाशिक : वणी येथे ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ जण ताब्यात

मॅजिक फिगर ६७

लोकसंख्येनुसार प्रभाग तयार केली जाणार असल्याने ज्या भागात अधिक लोकसंख्या असेल तेथे अधिक प्रभाग होतील. त्यानुसार गावठाण भागात नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंचवटी, नाशिक रोड, सिडकोत नगरसेवक वाढतील. १२२ नगरसेवक असताना महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांची आवश्‍यकता होती. आता १३३ नगरसेवक झाल्यास मॅजिक फिगर ६७ होईल.

nashik municipal Corporation.jpg
नाशिक जिल्ह्यात ७२५ बाधितांवर उपचार सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com