नाशिक- आगामी कुंभमेळ्याचा पर्वणीकाळ व भाविकांना वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने शासनाच्या नगरोत्थान विभागाकडे ४०२ कोटींचा पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव मंजुरीपासून ते प्रत्यक्षात प्रकल्प अमलात येण्यापर्यंतच्या कालावधीचा विचार करता पुढील दोन वर्षात ते अशक्य आहे. परंतू, तपोवनातील साधुग्रामसाठी पुणे महामार्गावरून जलवाहिनी टाकली जाणार असल्याने महापालिकेचा द्रविडी प्राणायम चर्चेत आला आहे.