नाशिक शहरात मनपाकडून रॅपिड ॲन्टिजेन, आरटी-पीसीआर चाचणी मोहीम

शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून घरोघरी रुग्ण
RT PCR test
RT PCR testsakal

नाशिक : शहरात कोरोनाचा(Nashik Corona) विस्फोट झाला असून घरोघरी रुग्ण आढळून येत आहे. परंतु, बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने खरी आकडेवारी बाहेर येत नाही. त्यामुळे आता महापालिकेकडून रॅपिड ॲन्टिजेन व आरटी- पीसीआर चाचणी (RT-PCR test) करण्याची मोहीम आखली जाणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

शहरात कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत ७३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी घरोघरी कोरोना रुग्ण आढळून येत आहे. २७ डिसेंबर २०२१ ते ते ११ जानेवारी २०२२ या पंधरवड्यात शहरात ७३ टक्के कोरोना रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत ७,६५१ रूग्ण आढळले त्यातील पाच हजार ५९५ रूग्ण महापालिका हद्दीतील आहेत.

महापालिका व खासगी रुग्णालये, लॅब तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांवर उपचार केले जातात त्यातून आकडेवारी बाहेर येत आहे. प्रत्यक्षात शहरात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दर दोन ते पाच घरटी कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. रुग्णांचा खरा आकडा बाहेर येण्यासाठी महापालिकेकडून तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अवघ्या पंधरा दिवसात झालेली ७३ टक्के रूग्णवाढ लक्षात घेता कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर नियमाचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी उपाययोजना गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.

"शहरात कागदोपत्री कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने अधिक रुग्ण आहे. तपासणी अभावी तो आकडा बाहेर येत नाही. त्यामुळे तातडीने चाचणी करून रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आहे."

- सतीश कुलकर्णी, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com