नाशिक: आदिवासी जिल्ह्यातील नोकरभरती संदर्भात पेसा कायद्यानुसार शासनाने बिंदूनामावली मंजुरी केली आहे. त्यामुळे महापालिकेला मंजूर असलेल्या १४० तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला दिलासा मिळाला असून तत्काळ भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशी माहिती आयुक्त मनिषा खत्री यांनी दिली.