Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी ७२९ उमेदवार रिंगणात आहे. एकूण उमेदवारांपैकी ६० उमेदवारांना राजकीय वारसा असून मुलगा, पुतण्या, सुना अशी नातेवाईकांचे गुंफण तयार झाली आहे. मतदार नात्याला महत्त्व देतात की नवीन चेहरा शोधतात हे येत्या १६ जानेवारीला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल. सर्वाधिक नात्यांची गुंफण भाजपमध्ये गुंफल्याचे दिसते.