नाशिक- आगामी निवडणुकीसाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून, २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या गृहीत धरून सातशे मतदारांमागे एक मतदान केंद्र तयार केले आहे. एकूण एक हजार ९४४ मतदान केंद्रे निवडणुकीत राहणार असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. तसेच १३ लाख सहा हजार ८२१ मतदारांची संख्या गृहीत धरली आहे.