Nashik municipal election
sakal
नाशिक: नाशिक महापालिकेत स्वबळावर १२२ जागा लढवत असताना उमेदवारीवरून भारतीय जनता पक्षात नाराजी आहे. महायुती केली असती तर पक्षाच्या वाट्याला केवळ ५० जागा आल्या असत्या, त्या परिस्थितीत काय झाले असते, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हणाले. आपली लढाई इतरांशी नसून, मित्रपक्ष शिवसेनेशीच आहे. महापालिकेत जागांचे शतक ठोकण्यासाठी पक्षातील नव्या-जुन्यांनी एकत्रित येत कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.