Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपमध्ये बंडखोरीची धास्ती निर्माण झाली होती. ती टाळण्यासाठी परस्पर ‘एबी’ फॉर्म देण्याचा प्रयोग अखेर भाजपच्या अंगलट आला. विल्होळी येथील फार्म हाउसवर तिकीटवाटप सुरू असल्याच्या चर्चेने शेकडो इच्छुक कार्यकर्ते तेथे धावले. मात्र वरिष्ठांकडून ठोस भूमिका न मांडल्याने संयमाचा बांध फुटला आणि परिसरात राडा उसळला. ही घटना मंगळवारी (ता. ३०) दुपारी घडली.