

Nashik Civic Poll Campaign Turns Chaotic as Unpaid Women Clash Outside Police Station, Video Goes Viral
esakal
नाशिक : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात महिला आणल्या जातात. गर्दी दाखवण्यासाठी आणि सभांना चांगला प्रतिसाद मिळावा याकरिता अनेक राजकीय पक्ष महिलांना रोजंदारी देऊन प्रचारात सहभागी करून घेतात. सामान्यतः या महिलांना तीनशे ते पाचशे रुपये एवढी मजुरी दिली जाते. मात्र, नाशिकमध्ये असा प्रकार घडला की जिथे महिलांना प्रचारासाठी बोलावले गेले, परंतु संध्याकाळी पैसे देण्यात आले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या महिलांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आणि थेट हाणामारीच झाली.