Nashik Municipal Election | युवा नेते सोशल मीडियावर अजमविणार नशीब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

municipal elections

Nashik Municipal Election | युवा नेते सोशल मीडियावर अजमविणार नशीब

सिडको (नाशिक) : सिडकोत सामाजिक, राजकीय व सोशल मीडियावर (Social media) नेहमी सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता आघाडी घेत आगामी महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची ही त्यांची पहिलीच वेळ असून, त्यांचे नशीब त्यांना किती साथ देते, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Municipal Election)

अनेकांंचे पहिल्यांदाच निवडणूक लढविण्याचे धाडस

सातत्याने नागरिकांच्या समस्या सोडविणे व त्याला वाचा फोडण्याचे काम त्यांनी या पाच वर्षांत केले आहे. याबाबत त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. चुकीच्या गोष्टींना त्यांनी नेहमीच चव्हाट्यावर आणल्या आहेत. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पर्यावरणासाठी त्यांनी चळवळ उभी केल्याचे दिसून आले. यातील काहीजण प्रत्यक्षात, तर बहुतांश जण नेहमी सोशल मीडियावर जनजागृती व आवश्यक ती कामाची माहिती शेअर करण्यात अग्रेसर असतात. सोशल मीडियाचा ते नेहमीच सदुपयोग करतानाही दिसतात. नगरसेवक झाल्यानंतर आपण नागरिकांसाठी आणखी जोमाने काम करू शकतो, याची जाणीव झाल्याने अनेक जण पहिल्यांदाच निवडणूक लढविण्याचे धाडस करीत आहेत. कोरोनाकाळात (Corona) त्यांचे काम खरोखर वाखाणण्याजोगे होते.

सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची फौज

अजय बागूल, दीपक बडगुजर, अजिंक्य चुंभळे, अविनाश शिंदे, नीलेश चव्हाण, पवन मटाले, शिवम ठाकरे, प्रशांत खरात, भूषण राणे, संजय भामरे, संतोष सोनपसारे, बाळासाहेब गिते, विजय पाटील, माणिक जायभावे, वैभव महाले, योगेश गांगुर्डे, सुमीत शर्मा, किरण गाडे, मनोज आहिरे, अंकुश वराडे, राजेंद्र जडे, प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, अजिंक्य गिते, शिवाजी बरके, सागर चौधरी, सुधाकर जाधव, विशाल डोखे, अक्षय परदेशी, मुकेश शेवाळे, अक्षय खांडरे, नाना ठोंबरे, बाळासाहेब घुगे, उत्तम काळे, अशोक पवार, चंद्रकांत पाटोळे, मकरंद वाघ, आतिश पाटील, गणेश मोरे, अमित कुलकर्णी, राहुल कमानकर, अजय ठाकूर, मकरंद सोमवंशी, मदन जमधाडे, कृष्णा काळे, संदीप मंडलेचा, रवी पाटील, ॲड. परमानंद पाटील, रमेश वडनेरे, अनिल दुसाने, कैलास मोरे, संदेश जगताप, अजय ठाकूर, सुयश पाटील, नितीन माळी, राहुल पवार, अर्जुन वेताळ, शैलेश साळुंखे, अनंत शिंदे, देवचंद केदार, तन्मय गांगुर्डे, योगिता हिरे, रश्मी हिरे, चारुशीला गायकवाड, हर्षदा फिरोदिया, शिवानी पांडे, वंदना पाटील, अर्चना दिंडोरकर, शीतल विसावे, सुवर्णा कोठावदे.