नाशिक- महापालिका हद्दीसाठी मंजूर करण्यात आलेल्या विकास आराखड्यातील विकसित व अविकसित क्षेत्राची भौगोलिक माहिती जिओग्राफीकल मॅपिंग प्रणालीच्या (जीआयएस) आधारे अद्ययावत करून डिजिटल स्वरूपात नकाशे तयार करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या कामात विकसित क्षेत्र अधिक आढळल्याचे कारण देत मक्तेदार कंपनीला ११ कोटी ३३ लाख रुपये अतिरिक्त मोजले जाणार आहेत.