नाशिक: जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांच्या प्रारूप प्रभागरचनेवर स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांनी हरकतींचा पाऊस पाडला आहे. जिल्ह्याभरातून तब्बल ९१ हरकती व सूचना प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या सूचनेनुसार या सर्व हरकतींवर प्रांताधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे.