
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात बंद फ्लॅटमध्ये गुरुवारी (ता. २९) विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तिचा पती गेल्या तीन दिवसापासून पसार असल्याने त्याच्यावरच संशयाची सुई आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातलग आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत अधिक वाढली आहे. (murder of woman in area of Pathardi Phata is done by her husband )