

Nashik Central Assembly Constituency : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात ‘नाशिक मध्य’चा तिढा अद्यापही कायम असून, मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांमध्ये जागेसंदर्भात चर्चा सुरू होती; परंतु मध्यमधून शिवसेनेकडून इच्छुक असलेले माजी आमदार वसंत गिते यांना पक्षाचा एबी फॉर्म घेण्यासाठी पाचारण करण्यात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केल्यावर आपल्यापर्यंत जागेचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, बुधवारी (ता. २३) दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. (MVA cofusion about Central Constituency)