Market Committee News : नामपूरला बाजार समितीला खासगी बाजार समितीचे आव्हान

Nashik News : बाजार समितीचे कांदा लिलावात सातत्य नसल्याने एप्रिल महिन्यात केवळ ९ दिवस लिलावाचे कामकाज झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
Nampur Record arrival of summer onion in the market committee here.
Nampur Record arrival of summer onion in the market committee here.esakal

Nashik News : येथील बाजार समितीचे आवार आणि मोसम कृषी खासगी मार्केटमध्ये कांद्याच्या लिलावावरून शह-काटशहाचे राजकारण आहे. लेव्हीच्या मुद्द्यावरून माथाडी कामगारांचे आंदोलन, आर्थिक टंचाई, मजूर टंचाई, पावसाळी वातावरण, शासकीय सुट्टया आदी कारणांमुळे बाजार समितीचे कांदा लिलावात सातत्य नसल्याने एप्रिल महिन्यात केवळ ९ दिवस लिलावाचे कामकाज झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. (Nashik Nampur has challenges of private market committee)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदीचा निर्णय घेतला असला तरी जागतिक बाजारपेठेत ४० टक्के निर्यात शुल्कामुळे कांद्याच्या दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गुरूवारपासून येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असून, सोमवारी (ता. १३) लिलाव पूर्ववत होतील, असे सभापती मनीषा पगार, सचिव संतोष गायकवाड यांनी सांगितले.

येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात दैनंदिन ८०० ते १ हजार वाहनांमधून सुमारे १८ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होते. लिलावकाळात बाजार समितीत शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जातात. उन्हाळ कांद्याला १ हजार ४०० ते १ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळत आहे.

लेव्हीच्या मुद्द्यावरून एप्रिल महिन्यापासून लिलावानंतर तोलाई, वाराई, हमाली कपात न करता पूर्ण रक्कम रोख स्वरूपात शेतकऱ्यांना मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. (latest marathi news)

Nampur Record arrival of summer onion in the market committee here.
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

अधिकाधिक सुविधांवर द्यावा लागेल भर

बाजार समितीमधील कांद्याच्या लिलावाला अनेक दिवसांपासून ग्रहण लागल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एप्रिल महिन्यातील अनेक दिवस माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या मुद्द्यावरून बाजार समिती बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी होत होती. येथील कांदा व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे बाजार समितीचे प्रशासन अडकित्त्यात सापडले आहे.

त्यामुळे व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार मजूर टंचाई, आर्थिक टंचाईमुळे बाजार समितीतील लिलाव बंद असताना कांदा व्यापाऱ्यांच्या खासगी मार्केटमध्ये मात्र सुरळीत लिलाव होत असल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात बाजार समिती प्रशासनाला व्यापाऱ्यांची संख्या वाढवून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

शेतकऱ्यांचा फायदा झाला किती?

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथील बाजार समितीच्या कांदा व्यापाऱ्यांनी पुढाकार घेवून कुपखेडा शिवारात स्थापन केलेल्या मोसम कृषी खासगी मार्केटचा परवाना पुणे येथील पणन संचालक विकास रसाळ यांनी आठवडाभरातच निलंबित केला. याबाबत नामपूर बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी पणन संचालकांकडे लेखी तक्रार केली होती.

त्यानंतर खासगी बाजार समितीच्या संचालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितल्याने पणनच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून खासगी मार्केट पुन्हा सुरू झाले आहे. बाजार समिती आणि खासगी मार्केट येथील व्यापारी जवळपास एकच असल्याने शेतकऱ्यांचा किती फायदा झाला, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

Nampur Record arrival of summer onion in the market committee here.
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com