.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
विकास गिते : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून विकास झालेल्या सिन्नर तालुक्यातील औद्योगिक वसाहतींत कारखाने आल्याने येथील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. सिन्नर तालुका पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांसाठी सुवर्ण त्रिकोणांतर्गत सिन्नरचे औद्योगिक महत्त्व वाढले आहे. मात्र काही उद्योग अनेक वर्षांपासून बंद पडलेले आहेत, ते सुरू करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. तसे झाल्यास सिन्नर खरोखरच पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपाला येईल. (Need to promote industries in Malegaon Musalgaon colony )