Nashik News : तलाठी 'तात्यां’च्या निवाऱ्यासाठी ‘काकां’चे प्रयत्न फळाला! निफाड तालुक्यात नवीन 10 तलाठी कार्यालयातून कामे सुरू

Nashik News : भौगोलिक दृष्टीने १३६ गावांचा समावेश असलेल्या निफाड तालुक्यात तब्बल ४३ तलाठी व आठ मंडलाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहेत
Work in progress at new Talathi office.
Work in progress at new Talathi office.esakal

चांदोरी : भौगोलिक दृष्टीने १३६ गावांचा समावेश असलेल्या निफाड तालुक्यात तब्बल ४३ तलाठी व आठ मंडलाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहेत. नवीन बांधल्या जाणाऱ्या तलाठी कार्यालयांमुळे ग्रामीण जनता आणि शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे. (Nashik New 10 talathi office in Niphad taluka marathi news)

तलाठ्यांचा शेती व शेतकऱ्यांशी नियमित संबंध येतो. तलाठ्यांची अपुरी संख्या, एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार आणि तलाठी कार्यालय नसल्याने निफाड तालुक्यातील ग्रामस्थांना तलाठ्याचा शोध घेत फिरावे लागत होते. यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबायची. याबाबत ग्रामस्थांनी आमदार दिलीपराव बनकर यांची भेट घेत तलाठ्यांबाबत येणारी अडचण त्यांना सांगितली.

ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत, आमदार बनकर यांनी तालुक्यातील तलाठ्यांची सर्वंकष माहिती संकलित करण्याचे आदेश दिले. त्याचा शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. निफाड तालुक्याची गरज लक्षात घेता, राज्य सरकारने नवीन तलाठी कार्यालय बांधण्यास मान्यता दिली. कार्यालयांच्या उभारणीसाठी १३ कोटी ६२ लाख ५५ हजार रुपये मंजूर झाले. त्यातून बांधलेल्या नवीन दहा तलाठी कार्यालयातून कामाला सुरवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

निफाड तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठ्या क्षेत्राचा. त्यामुळे नागरिकांना आवश्यक महत्त्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी, इतर कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. (latest marathi news)

Work in progress at new Talathi office.
Rahul Gandhi News: राहुल गांधींनी राम राम मंडळी म्हणत घातली साद! किसान शब्दाचा सर्वाधिक वापर अन पहिल्याच मिनिटात कांद्याला स्थान

शासनाच्या मंजुरीनंतर नवीन तलाठी कार्यालय बांधली असून, काही कार्यालयांत काम सुरू झाले आहे. तलाठी कार्यालयांमधून २१ गाव नमुना तयार करणे, नमुन्यांचे अद्ययावतीकरण, वारस नोंदी, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे, नुकसानभरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला आदी कामे होणार आहेत.

"नागरिकांची मागणी लक्षात घेत, नवीन मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय पूर्णत्वास येत असून, नागरिकांची अडचण यानिमित्त दूर होणार आहे."-दिलीपराव बनकर, आमदार, निफाड

"ग्रामीण भागात तलाठी शासन व शेतकरी यांच्यामधील दुवा असतो. शेत जमिनीसंबंधित अभिलेख अद्ययावत रहावेत.तसेच विविध नोंदणी,दाखले यासाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गावात सुसज्ज कार्यालय झाल्यानंतर नागरिकांसह कर्मचाऱ्यांचे काम सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होणार आहे."

-विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

"अद्ययावत बांधकामासह नवीन तलाठी कार्यालयातून सेवाही तेवढीच जलदगतीने मिळेल, हीच अपेक्षा आहे."-सुदाम खालकर, शेतकरी, भेंडाळी

Work in progress at new Talathi office.
Nashik Onion Rates Fall: आठवड्यात कांदा 400 ते 500 रुपयांनी घसरला! गुजरातमधून आवक होत असल्याचा परिणाम; शेतकऱ्यांमध्ये चिंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com