Nashik Educational News : नवीन शैक्षणिक वर्षाला 20 जूनपासून सुरवात

Nashik News : वाणिज्‍य आणि विज्ञान व तंत्रज्ञान यासह इतर शाखांतील विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या अध्ययन प्रक्रियेला २० जूनपासून सुरवात होणार आहे.
University of Pune
University of Puneesakal

Nashik News : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. त्‍यानुसार वाणिज्‍य आणि विज्ञान व तंत्रज्ञान यासह इतर शाखांतील विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या अध्ययन प्रक्रियेला २० जूनपासून सुरवात होणार आहे. प्रथम वर्ष वगळता, पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे द्वितीय वर्षांपुढील वर्षांकरिता दोन्‍ही सत्राच्या वेळापत्रकाचा यात समावेश केला आहे. (New academic year starts from 20th June)

महाविद्यालयांना अध्ययनाचे नियोजन करता यावे व विद्यार्थ्यांनादेखील अभ्यासाचे नियोजन आखता यावे, या उद्देशाने पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वेळापत्रक जारी केले जात असते. आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पुणे विद्यापीठाने विद्यापीठाच्‍या विविध विभागांचे तसेच संलग्‍न महाविद्यालयांकरिता वेळापत्रक स्वतंत्ररीत्या जाहीर केले आहे.

यापूर्वी कोरोना महामारीमुळे कोलमडलेले शैक्षणिक नियोजन शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पूर्वपदावर आलेले आहे. वेळीच अध्ययन प्रक्रिया पूर्ण करण्याचा महाविद्यालयांचा तर वेळीच परीक्षा घेण्यावर विद्यापीठाकडून भर दिला जातो आहे. याअनुषंगाने पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे शैक्षणिक वेळापत्रक जारी केलेले आहे.

२० जूनपासून अध्ययनाच्‍या प्रक्रियेला सुरवात होणार असून, काही अभ्यासक्रमाचे जुलैपासून अध्ययन सुरु करण्याचे नियोजन आखलेले आहे. प्रथम व द्वितीय सत्राला सुरवात, समारोप व परीक्षांच्‍या संभाव्‍य तारखांचा उल्‍लेख या वेळापत्रकात केलेला आहे. (latest marathi news)

University of Pune
Nashik Educational News : डिप्‍लोमा, डिग्री प्रवेशासाठी सज्‍ज ठेवा कागदपत्र!

या अभ्यासक्रमांचा समावेश..

विविध विद्या शाखानिहाय वेळापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विज्ञान शाखेतील पदवी (बी.एस्सी) ला २० जूनपासून सुरवात होईल. अभियांत्रिकीतील पदवी (बीई), पदव्‍युत्तर (एमई).

आर्किटेक्‍चरचे तसेच औषधनिर्माणशाखेचे पदवी व पदव्‍युत्तर अभ्यासक्रम व एमसीए अभ्यासक्रमास १ जुलैपासून सुरवात होईल. वाणिज्‍य शाखेचा अभ्यासक्रम तसेच एमबीए अभ्यासक्रमांना २० जूनपासून सुरवात होणार आहे. विधी शाखेतील अभ्यासक्रमदेखील यादरम्‍यान सुरु होतील.

परीक्षा ऑक्‍टोबर, एप्रिलमध्ये

अध्ययनासोबत परीक्षांच्‍या संभाव्‍य तारखांची घोषणादेखील केलेली आहे. त्‍यानुसार प्रथम सत्रातील परीक्षा ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्ये घेतल्‍या जाणार आहेत. तर द्वितीय सत्रातील परीक्षांचे आयोजन एप्रिल-मेमध्ये केले जाईल, असे पुणे विद्यापीठाने नमूद केले आहे.

University of Pune
Nashik Onion News : जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला ‘कांदा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com