नाशिक : अपघातग्रस्‍तांची ‘साथी’ ॲप करणार मदत

अपघातांच्या गंभीर समस्‍येवर तोडगा काढत नाशिकच्‍या होतकरू तरुणाच्‍या स्‍टार्टअपने साथी ॲप विकसीत केले आहे.
Startup-Policy
Startup-Policysakal

नाशिक : रस्‍ते अपघातांच्‍या प्रमाणात सातत्‍याने वाढ होत असून, यामध्ये जीवहानीही मोठ्या प्रमाणावर होते. अनेकवेळा अपघातग्रस्‍तांना वेळीच मदत न मिळाल्‍याने जीव गमवावा लागतो. या गंभीर समस्‍येवर तोडगा काढत नाशिकच्‍या होतकरू तरुणाच्‍या स्‍टार्टअपने साथी ॲप विकसीत केले आहे. मयूर जसनानी असे ॲप विकसीत करणाऱ्या युवा उद्योजकाचे नाव आहे.

राष्ट्रीय व राज्‍य महामार्गांपासून शहरातील अंतर्गत रस्‍त्‍यांवर रोजच अपघातांची मालिका घडत असते. या अपघातातील जखमींना बऱ्याच वेळा तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध होणे महत्त्वाचे असते, परंतु काही घटनांमध्ये वेळीच मदत न मिळाल्‍याने अपघातग्रस्‍तांना जीव गमवावा लागतो. या समस्‍येवर तोडगा काढताना हे ॲप काम करते. मयूरने विकसीत केलेले ‘साथी’ ॲप सर्वसामान्‍यांसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. ॲपच्या मदतीने अपघात झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना त्वरित संपर्क करून, जखमींचे प्राण वाचू शकतील.

Startup-Policy
Nashik : तारांगणातील तारे दोन वर्षांपासून अंधारातच

असे काम करते साथी ॲप

क्यूआर कोड दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर लावायचा आहे व हे ॲप वापरकर्त्यांनी मोबाईलमध्ये इंस्टॉल करायचे आहे. ॲप नसले, तरी गुगल लेन्स कॅमेरानेही हा कोड स्कॅन करता येतो. क्‍यूआर कोडमध्ये संबंधितांचा घरचा, जवळचे नातेवाईक, मित्र, शेजारी असे कोणतेही चार संपर्क नंबर सेव्ह करण्याची सुविधा आहे. गाडीचा अपघात झाल्याच्‍या प्रसंगात कोड स्कॅन केल्यावर उपलब्‍ध क्रमांकावर आपोआप संपर्क साधला जाईल. आणि अपघातग्रस्त व्यक्तीची माहिती त्याच्या नातेवाइकांपर्यंत पोहचू शकेल. यामुळे वेळेत रुग्‍णालयात दाखल करणे शक्‍य होईल.

Startup-Policy
तुम्हाला जर का अपचन, गॅस याचा त्रास असेल तर जेवणानंतर करा ही ५ योगासनं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com