
नाशिक : वर्ष सरायला अवघे दोन दिवस उरले असून, नववर्षाच्या स्वागतासाठी तयारीची लगबग सुरू झालेली आहे. ‘थर्टीफर्स्ट’निमित्त मंगळवारी (ता. ३१) मध्यरात्रीपर्यंत सवाद्य संगीत सोहळ्यांचे आयोजन अनेक मोठ्या हॉटेलांमध्ये केले आहे. त्यामुळे नववर्षाच्या जंगी स्वागताचे नियोजन नाशिककरांकडून सुरू आहे. अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत प्रतिव्यक्ती प्रवेशिकांचे दर आहेत.