Scholarship Exam : नाशिक जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; 52 हजारावर विद्यार्थ्यांची हजेरी

Scholarship Exam : शहरासह जिल्‍हाभरातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता.१८) पार पडलेल्‍या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.
Scholarship Exam
Scholarship Exam esakal

Scholarship Exam : शहरासह जिल्‍हाभरातील विविध परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता.१८) पार पडलेल्‍या शिष्यवृत्ती परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. बुद्धिमत्ता विषयाच्‍या प्रश्‍नांनी बहुतांश विद्यार्थ्यांना घाम फोडला होता. भाषा व गणित विषयांचे प्रश्‍न तुलनेत सोपे राहिल्‍याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. (nashik Scholarship Exam marathi news)

दरम्‍यान पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता पाचवी) परीक्षेला २८ हजार ०४२ विद्यार्थी सामोरे गेले. तर पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) परीक्षेला २३ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्‍यक्षात २८ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २८ हजार ०४२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर उर्वरित ७८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली.

Scholarship Exam
Scholarship Exam : 'शिष्यवृत्ती'कडे 51 हजार विद्यार्थ्यांची पाठ, तर 31 हजारहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

जिल्‍ह्‍यातील १९८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली होती. आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २३ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी केंद्रांवर उपस्‍थित राहात परीक्षा दिली. तर ७२४ विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर होते. १६८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

भरारी पथकाची नियुक्‍ती

परीक्षेदरम्‍यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली होती. पाचवीच्‍या परीक्षेसाठी १९८ केंद्र संचालक, ६ उपकेंद्रसंचालक, १ हजार ४३८ पर्यवेक्षक, आणि ३८३ शिपाई असे मनुष्यबळ नियुक्‍त केले होते. तर आठवीसाठी १६८ केंद्र संचालक, १ हजार २२० पर्यवेक्षक, व ३२५ शिपाई नियुक्‍त केले होते. प्रत्‍येक तालुक्‍याला एक संपर्क अधिकारी नियुक्‍त केला होता. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्‍ती केली होती. ( latest marathi news )

Scholarship Exam
Scholarship Exam : राज्यातील 9 लाख विद्यार्थ्यांची रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com